स्थापना : ०२/०२/२००२
रजि नं : KPR/KVR/RSR/CR - २७०७

रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणारी वित्त संस्था...
माझी, आपली, सर्वांची नारायणी पतसंस्था...

आजची गुंतवणूक - उद्याचे भविष्य

रोजच्या बचतीचे महत्व जाणा,
छोट्यातून मोठी मिळकत घरी आणा

करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या कृपाशीर्वादाने स्थापन झालेली व सहकार क्षेत्रातील अग्रगण्य महिला पतसंस्था, नारायणी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोल्हापूर. महिलांनी महिलांकरिता चालवलेली नारायणी महिला नागरी सहकारी पतसंस्था

  • विश्वासार्ह आणि सुरक्षित बँकिंग सेवा
  • त्वरित आणि सोपी सेवा
  • विविध वित्तीय सेवा
  • प्रशिक्षित कर्मचारी

ज्या सुविधा बँकेत, त्याच नारायणी पतसंस्थेत.

सेवा, विश्वास, प्रगती = नारायणी पतसंस्था

खाते

दैनंदिन बँकिंगपासून ते उच्च-उत्पन्न बचतीपर्यंत, आपल्याकडे ३ प्रकारचे खाते तयार होतात, बचत / Saving खाते, चालू / Current खाते आणि पिग्मी खाते

कर्ज

लघुउद्योग, सोनेतारण ,बचत गटांना आर्थिक सहाय्य,त्याचबरोबर मालमत्ता खरेदी करताना अत्यंत अल्पावधीमध्ये कर्ज सुविधा उपलब्ध.

ठेव

संस्थेमध्ये विविध ठेव योजना उपलब्ध आहेत छोटी गुंतवणूक भविष्यामध्ये मोठी मिळकत.



महिला बचत गट

असंघटित महिलांना एकत्र करून महिला बचत गटाची स्थापना केली जाते.यामधून महिलांना स्वतंत्र स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य आपली पतसंस्था करते.

महिला बचत गट किमान 10 जास्तीत जास्त 50 महिला एकत्र करून महिला बचत गटाची स्थापना करता येते. बचत गटाचा अध्यक्ष हा संस्था निवडेल .त्यासाठी विशेष निकष ठेवण्यात आलेले आहेत. व्यवसाय वृद्धीकरिता कर्ज देण्यात येत असल्याने प्रत्येक महिलेचा व्यवसायाची खात्री करणे आवश्यक आहे त्याकरिता संस्थेची प्रतिनिधी प्रत्येक महिलेच्या घरी जाऊन व्यवसायाची खात्री करतील. त्यानंतर सर्व गट संस्थेमध्ये प्रत्यक्ष येऊन करंट अकाउंट बचत गटाचे आणि वैयक्तिक शेअर्स भरून सर्व महिला प्रतिनिधी या संस्थेच्या सभासद होतील त्यानंतर सर्व महिलांची एकत्रित मीटिंग होऊन संस्थेची सर्व माहिती त्यांना देण्यात येईल. संस्थेमध्ये असणारे पूर्वीची बचत गट आणि नवीन बचत गट यांच्यामध्ये एक स्वतंत्र स्पर्धा लावण्यात येईल सदर स्पर्धेचे निकष हे मीटिंगच्या वेळी सांगण्यात येतील.

20+

महिला बचत गट